गटारे, सार्वजनिक शौचालये, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई
स्वच्छतेविषयी जनजागृतीवर भर

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली. अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उपसर प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारी अंतर्गत रस्ते सार्वजनिक शौचालय यांची सर्वांक स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात, या स्वच्छता मोहिमेत सुमारे १०० स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला.
सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी होईल, असा विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *