प्रयोगशाळा जशा सामान्य माणसाच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि उत्तम जीवनासाठी वेगवेगळे शोध लावून त्याचे जीवन संपन्न करतो तशाच या प्रयोगशाळा देशामधील उद्योग, उत्पादन आणू त्यामधून होणारी निर्यात यातून देशासाठी संपन्नता आणीत असतात. त्यांचे महत्व कधीच कमी लेखता येणार नाही. मग प्रयोगशाळा कशासाठी आहे यापेक्षा ती देशाला आणि माणसाला कोणती मदत करू शकते हे अधिक महत्वाचे मानले जाते.
प्रयोगशाळा म्हटल्या की तेथे काम करण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित आणि संशोधनाला समर्पित असे वैज्ञानिक आवश्यक असतात आणि आजकाल असे पाहिले गेले आहे की मूलभूत संशोधनाकडे फारसे विद्यार्थी जात नाहीत. त्यापेक्षा एखाद्या उद्योगातील प्रयोगशाळेत काम करायला त्यांना आवडत असावे. प्रयोगशाळांच्या बाबतीत अशी अडचण समोर आली तेव्हाच कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय होत होता आणि ती आपली कार्ताच्गारी स्पष्टपणे दाखवीत होती. इतकी की ही कृत्रिम बुद्धिमत्ता एक दिवस माणसालाच अडगळीत टाकाणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.
परंतु त्या अगोदरच या नव्या बुद्धिमत्तेने आपली ताजी चुणूक दाखवली आहे. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंचलित प्रयोगशाळा निर्माण होऊ शकतील अशी माहिती प्रसारित होऊ लागली आहे आणि त्याचे अनेक देशांनी त्यातील आर्थिक आणि सुरक्षा या क्षेत्रातील प्रचंड उपयोगामुळे स्वागत केले आहे.
स्वयंचलित प्रयोगशाळा या विषयाला असे प्राधान्य का मिळत असावे याची कारणे आहेत. त्यातले सर्वात महत्वाचे कारण असे की अशा स्वयंचलित प्रयोगशाळा स्वतंत्रपणे मानवाला आरोग्य आणि इतर कारणांसाठी उपयुक्त अशा नवीन पदार्थांचे शोध लावू शकतील. अर्थातच ते सुरुवातीच्या काळात आवश्यक तेवढे विश्वासार्ह असतील, वारंवार तसेच तयार केले जाऊ शकतील किंवा सामान्य माणसाला परवडतील अशा दरात देता येतील याची अजून खात्री पटत नाहीय.
एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या नव्या पदार्थाचा अथवा औषधाचा शोध प्रयोग्शालेपासून तो उत्पादन आणि विक्रीपर्यत पोचताना किमान २० वर्षांचा काळ आणि १० कोटी डॉलर्स इतका खर्चे येतो असे मानले जाते. म्हणजे आज सुरुवात केली तर सध्याच्या प्रयोगशाळेतील पहिले औषध इसवी सन २०४४ मध्ये येण्याची “शक्यता” असेल, खात्री देता येणार नाही.
स्वयंचलित प्रयोगशाळा या विषयाचे एक तज्ञ आणि अमेरिकेतील उतार कॅरोलिना राज्य विद्यापीठाचे सह-प्राध्यापक मिलाद अबोलहसानी म्हणतात की अशा प्रयोगशाळा १०० ते १००० पात अधिक वेगाने संशोधन करू शक्तील आणि शोध प्रत्यक्षात येण्याचा काळ बऱ्याच प्रमाणात कमी होईल. ते अशा तंत्रज्ञानावर काम करीत आहेत.
अगोदरचे संशोधन आणि नव्या कल्पनेनुसार संशोधनाचा आराखडा तयार करणे, त्यावर संशोधन, पूर झाल्यानंतर त्याची आरोग्य अथवा औद्योगिक चाचणी, विश्लेषण आणि उत्पादनाचा आराखडा ठरवून ते सुरु करणे असे सर्वसाधारणपणे प्रयोगशाळांचे काम असते. स्वयंचलित प्रयोग्शाळांमध्ये या कामात यंत्रमानव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत संगणक कौशल्य यांचा समावेश असतो. कृत्रिम बुद्धिमत्ता तिने केलेल्या प्रयोगातून शिकते आणि त्यानंतर आवश्यक तेव्हा निर्णय देखील घेऊ शकते.
काही रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेथी पूर्वी सहा महिने लागत असत तेथे आता या प्रयोगशाळा तेच काम केवळ पाच दिवसात करतात असे दिसले. गेल्या वर्षी अमेरिकेतील लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेसारख्या काही स्वयंचलित प्रयोगशाळांनी अतिशय उपयोगी असे ४० नवे पदार्थ शोधून काढले आहेत अशी माहिती दिली गेली होती.
अर्थात हे सगळे असले तरी कोणत्याही नव्या विज्ञान किंवा तंत्रज्ञानाला सिद्ध व्हायला वेळ लागणारच. पण नवीन शोध त्यामुळे लवकर लागले तर माणसाचे जीवन अधिक सुखकर होईल इतकेच…
प्रसन्न फीचर्स