मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
