ठाणे : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम उद्या, मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डी.एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था, व्यक्तिंचा सत्कार तसेच माजी सैनिकांना कल्याणकारी निधीचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक पत्नी, पाल्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव यांनी केले आहे.