प्रतिक, देवेन, करण, हर्षदा आघाडीवर

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बुध्दिबळ स्पर्धेत दुसऱ्या साखळी फेरी अखेर प्रतिक कनोजिया, देवेन बनसोडे, करण कदम, हर्षदा साळुंखे आदींनी साखळी दोन गुणासह संयुक्त आघाडी घेतली. पहिल्या पटावर प्रतिक कनोजियाने चिन्मय मेस्त्रीच्या धूर्त चालींना यशस्वी शह देत २१ व्या मिनिटाला विजय मिळविला. दुसऱ्या पटावर देवेन बनसोडेने कौस्तुभला, हर्षदा साळुंखेने गौरवला तर करण कदमने नैनील शिखरेला हरवून दुसरा गुण वसूल केला. प्राचार्या वैशाली घेगडमल, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, पंच चंद्रकांत करंगुटकर आदींच्या उपस्थितीत कॉलेज बुध्दिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला.

संघाचे अघ्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कामगार महर्षी स्व.गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय आणि कॉलेज मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेला १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. परेल येथील आरएमएमएस सभागृहात प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय ख्यातीचे ज्युनियर कॅरमपटू मिहीर शेख, व्हिवा कॉलेज-विरारचा भव्या सोळंकी, रुपारेल कॉलेजचा कुणाल जाधव, जन गण मन कॉलेज-कल्याणचा गिरीश पवार, पोद्दार कॉलेजची रुची माचीवले, सिध्दार्थ कॉलेजची सानिका जाधव, ओमकार इंटरनॅशनल कॉलेज-डोंबिवलीची प्रेक्षा जैन, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे, युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरचा वेदांत राणे, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा प्रसाद माने व देविका जोशी, पुण्याची तनया पाटील, रुईया कॉलेजची सिमरन शिंदे आदी नामवंत ११२ स्पर्धकांचा दर्जेदार कॅरम खेळ परळकरांना पाहण्यास मिळणार आहे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *