अलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे – अलिबाग येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत दैनिक लोकमत चे संपादक अतुल कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पत्रकारांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भारत रांजणकर 9226152489, राजेश भोस्तेकर 9881878732 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *