तुळजापूर: महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात महिलांसाठी आणि भाविकांसाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी नवरात्र उत्सवादरम्यान लाखो भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आणि अनेक महिलांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून दिला. तसेच, त्यांच्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानातून राज्यभरात 4 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत उपचार करण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी स्वखर्चाने क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात 30 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच महिला बचत गटांना देखील मदत केली. त्यांच्या या कार्याचा आदर व्यक्त करण्यासाठी तुळजापूर येथे 1500 महिलांनी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व महाआरती केली.
महिलांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की, प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी.
तुळजाभवानीच्या चरणी केलेली ही प्रार्थना सावंत यांच्यावरील विश्वास आणि प्रेम दाखवते. राज्य शासनाने त्यांच्या अनुभवाचा सन्मान करावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
0000