आमदार निरंजन डावखरे व भाजपा उपाध्‍यक्षा अनुराधा रोडे यांची समस्‍या समाधानासाठी आयुक्‍तांची घेतली भेट

ठाणे : वाढत्‍या नागरिकरणामुळे शहराचा मध्‍यवर्ती भाग म्‍हणून ओळखला जात असलेला माजिवडा परिसर सध्‍या कचरा व अनधिकृत फेरीवाल्‍यांच्‍या समस्‍येने ग्रस्‍त झाला आहे. याबाबत हैराण झालेले नागरिक अनेकवेळा आपली नाराजी व्‍यक्‍त करत असतात. नागरिकांच्‍या या समस्‍या लक्षात घेऊन आमदार निरंजन डावखरे व भाजपा उपाध्‍यक्षा अनुराधा रोडे यांनी आज महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांची भेट घेतली.
माजिवडा भागातील अनेक रस्‍त्‍यांवर सध्‍या कचऱ्याचे साम्राज्‍य पसरलेले आहे. अनेकवेळा तक्रार केल्‍यानंतर तात्‍पुरती साफसफाई होते. याचबरोबर अनधिकृत फेरीवाले, कार वॉशिंगवाले, झाडांच्‍या नर्सरीवाल्‍यांनी थांड मांडले आहे. यामुळे रस्‍त्‍यावर सतत घाण होत असते. तसेच अनेकवेळा त्‍यांच्‍यातील भांडणांमुळे नागरिकांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. पालिका व बांधकाम व्‍यावसायीक यांच्‍यापेकी रस्‍ते कुणाच्‍या मालकीचे यावरूनही संभ्रमावस्‍था असल्‍याने प्रत्‍येकजण आपली जबाबदारी झटकत असतो व त्‍याचा फटका नागरिकांच्‍या सुरक्षेवर, परिसराच्‍या स्‍वच्‍छतेवर होत असतो. याबाबत अनेकांनी भाजपा उपाध्‍यक्षा अनुराधा रोडे यांच्‍याकडे तक्रारी केल्‍या होत्‍या.
आज आमदार निरंजन डावखरे व अनुराध रोडे यांनी पालिका आयुक्‍त सौरभ राव यांची भेट घेऊन त्‍यांच्‍याकडे नागरिकांच्‍या समस्‍यांचा पाढा वाचला.
अखेर आयुक्‍त सौरभ राव यांनी या समस्‍यांची तातडीने दखल घेतली जाईल व त्‍यावर उपाययोजना केल्‍या जातील असे आश्‍वासन डावखरे व रोडे यांच्‍या शिष्‍टमंडळाला दिले. यामुळे माजिवडा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *