नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी या आज संसदेत ‘मोदी अदानी भाई-भाई’ असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरुन भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. सोनिया गांधी या जॉर्ज सोरोस याच्यासोबत हातमिळवणी करत भारतविरोधी अजेंडा चालवत आहेत. काँग्रेस देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप जे.पी. नड्डा यांनी केला.