मुंब्राःयेथील बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला.गुजरात वरुन मुंब्रा बायपास मार्गे ट्रक मधून कर्जतकडे २८ टन रेती घेऊन चाललेल्या ट्रक चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्यामुळे ट्रकने सध्या बंद असलेल्या टोलनाक्या जवळच्या रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली.
ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता घडली.पोलिस हवालदार शामराव पाटील यांनी याबाबतची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली.माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस,अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.अपघातग्रस्त ट्रकच्या चालक केबिनमध्ये अडकलेल्या रियाज अहमद या ट्रक चालकाला अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले.त्याच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली.या अपघातामुळे या रस्त्यावरून ठाण्याहून शिळफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिके वरील वाहतूक सुमारे एक तास संथ गतीने सुरु होती.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *