मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता होईल. ही स्पर्धा केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच आहे. स्पर्धेचे संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या facebook, instagram अकाऊंटवर तसेच संकेतस्थळ www.dadarmatungaculturalcentre.org उपलब्ध आहेत.प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०.
००००