ठाणे : ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट जोमाने वाढतोय हे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात वागळे स्टेट पोलीस पथकाने छापा मारून तीन रशियन व एका भारतीय तरुणींची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका केली. या प्रकरणी मुंबईतील जुहू येथे राहणार्या दलालावर वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील जुहू परिसरात राहणारे काही दलाल मोबाइलवर ग्राहकांना विदेशी तरुणींचे फोटो पाठवून तसेच विदेशी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसाय चालवत होते. दरम्यान, हे दलाल तीन रशियन व एका भारतीय तरुणींना ठाण्यात अनैतिक व्यवसायासाठी पाठवणार असल्याची माहिती वागळे पोलीस पथकास मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील सोळा नंबर रोड परिसरात एका हॉटेल समोर छापा मारला. यावेळी घटनास्थळी तीन रशियन व एक भारतीय तरुणी आढळून आल्या. या तरुणींना शरीरविक्रेय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे तपासातून समोर आले. त्यानंतर पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून. हा व्यवसाय चालवणार्या जुहू येथील दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.