मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे प्रतिपादन

 

ठाणे : मुंबईच्या मैदान क्रिकेटमध्ये शिवाजीपार्कचे मैदान मुलांच्या क्रिकेटसाठी महत्वपूर्ण आहे. त्याच धर्तीवर डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती क्रिकेट स्पर्धा महिलांच्या क्रिकेटला चालना देण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केले. सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आणि एमआयजी क्रिकेट क्लब यांच्यातील अंतिम सामन्याची शुभारंभी घंटा अजिंक्य नाईक वाजवण्यात आली त्यावेळी महिला क्रिकेटपटूंना सदिच्छा देताना नाईक म्हणाले.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी डॉ राजेश मढवी यांनी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. पहीली चार वर्षे ही स्पर्धा टी-२० प्रारूपात खेळवण्यात आली. पण यंदा मुंबई क्रिकेट संघटनेने स्पर्धेला १९ वर्षे वयोगट आणि वरीष्ठ संघाच्या निवड चाचणीचा दर्जा दिल्याने मूळ प्रारूपात बदल करून ती ४० षटकांची एकदिवसीय प्रारूपात खेळवण्यात आली. यावर्षी स्पर्धेत गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लब आणि उपविजेटी रिगल क्रिकेट क्लबसह अ श्रेणीतील चौदा संघांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तर उपविजेता संघ दुसऱ्या फेरीतच बाद झाला होता.
अंतिम सामन्याची सुरुवात करुन देण्यासाठी अजिंक्य नाईक यांच्यासह मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, सहसचिव दिपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेच्या खेळ सुधारणा समितीच्या प्रिती डिमरी, निवड समिती सदस्या लिया फ्रान्सिस, विणा परळकर, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ. राजेश मढवी, सहसंयोजिका सुषमा मढवी,
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *