वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती आज (ता. १४) वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप वाडा तालुका शाखेच्या वतीने वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली.
वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, विक्रमगड विधानसभा निवडणूकप्रमुख डॉ.. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, नरेश आक्रे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील, कुणाल साळवी, हर्षल खांबेकर, प्रसाद सोनटक्के, राम भोईर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडूस नाका येथेही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घोणसई ग्रामपंचायतीत सरपंच शैला जाबर, उपसरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
