मुंबई: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी लाखोंचा समुदाय चैत्यभूमीवर लोटला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी चैत्यभूमी स्मारक येथे जाऊन डॉ आंबेडकरांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली तसेच राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवर दान (वस्त्र) करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मुंबई शहर कार्यालयातर्फे चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत राज्यपालांनी ‘मी मतदानाचा हक्क बजावणारच’ लिहिलेल्या फलकावर स्वाक्षरी केली.

छाया- संतोष नागवेकर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *