ठाणे : निवृत्त पोलिस सहाय्यक आयुक्त व्यंकट पाटील लिखित आणि संधिकाल प्रकाशनाच्यावतीने ‘कोब्रा’ या कांदबरीचे प्रकाशन सोहळा ठाणे मराठी ग्रंथ संग्रहलाय येथे संपन्न झाला. यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ज्येष्ठ साहित्यिक तसेच नाट्यकर्मी अशोक समेळ उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अभिनेते व जेष्ठ साहित्यिक श्री अशोक समेळं यांच्या व पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांचे हस्ते कोब्रा कादंबरीचे औ्पचारिक प्रकाशन पार पडले.
सदर कार्यक्रमात बोलताना अशोक समेळ म्हणाले की, पोलीसात अशी सर्जनशील माणसं खूप कमी आहेत जी संवेदनशील मनाने लिहू शकतात. व्यंकट पाटील यांच्यात खूप मोठा लेखक दडलेला आहे, ही कादंबरी एकदा वाचायला घेतली की पूर्ण झाल्याशिवाय कोणी बाजूला ठेवू शकणार नाही.
तसेच डॉ. प्रदीप ढवळ मेसेज द्वारे म्हणाले की, पोलीस खात्यातला एक अधिकारी इतकं चांगल लिहू शकतो हे कौतुकास्पद आहे. त्यांनी एखाद चरित्र लिहल्यास शासना तर्फे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
डॉ. देवगिरकर, संधिकाल प्रकाशनाचे प्रकाशक श्री अरविंद जोशी यांनी लेखकांचे कौतुक केले. नीता माली यांनी व बामणे यांनी कादंबरीचे समीक्षण केले तर प्रा. प्रज्ञा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
००००