अशोक गायकवाड

रायगड :निजामपूर ता.माणगाव येथील पीएमसी स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठीचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.i वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावेत अशी माहिती विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज राऊत यांनी दिली आहे.*

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर एकूण २ हजार ३७४ विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण ८० जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक परीक्षा ओळखपत्रे या https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी संतोष चिंचकर ९८८१३५१६०१ ,अर्जुन गायकवाड ९८६२७९३६४०, वर्षा सावंत ७२७६००८३९९ यांना संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *