एनआरएमयुचा हा ऐतिहासिक विजय रेल्वे कामगारांना समर्पित – वेणू नायर

अनिल ठाणेकर

ठाणे : भारतीय रेल्वेत ४ ते ६ डिसेंबरला रेल्वे कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली. या निवडणुकीत वेगळ्या संघटनांनी भाग घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मात्र कामगारांच्या विश्वासावर एकटी मान्यतेसाठी निवडणूक रिंगणात होती. कामगारांनी या निवडणुकीत आव्हानाला सडेतोड उत्तर देऊन आपला विश्वास,  सर्वधर्म समभाव असलेली व कामगारांचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरचिटणीस वेणू नायर यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला विजय मिळवून दिला.रेल्वे कामगारांचा हा ऐतिहासिक विजय असून, हा विजय आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रीया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू नायर यांनी दिल्याचे कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी सांगितले.

नॅशनल रेल्वे फेडरेशन ऑफ इंडिया ला संलग्न असलेली सेंट्रल रेल्वे मंजूर संघटना या संघटनेने आपला संपूर्ण जीव ओतून अनेक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कामगार संघटनाला सोबत घेऊन: मान्यता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला मान्यता मिळू नये म्हणूनसर्व संघटना बरोबर हातमिळवणी केली. परंतु कामगारांच्या मनात रुजलेली, भ्रष्टाचारी नसलेली शंभर वर्षाची परंपरा असलेल्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला ४१.५८ टक्के मतदान करून मध्य रेल्वेच्या कामगारांनी मोठे योगदान देऊन विरोधी संघटनांना त्यांची जागा दाखवून दिली. या निवडणुकीत रेल्वे कामगारानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर विश्वास ठेवून आपले बहुमूल्य मतदान केले. त्याबद्दल युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी कामगारांना धन्यवाद देऊन सांगितले की.  रेल्वे कामगारांचा ऐतिहासिक विजय असून, हा विजय  आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत यबद्दल. . या निवडणुकीत कामगारांची एकता,  प्रगतीची दिशा दिसून आली. या निवडणुकीत प्रत्येक शाखा, मंडळ,  मुख्यालय व प्रत्येक सदस्यांनी मनापासून काम केले,  त्याचीच ही पोहचपावती आहे. रेल्वे कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता मिरवणूक काढून मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळालेल्या मान्यतेचा हा ऐतिहासिक विजयी सोहळा साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे विविध ठिकाणी मोर्चे काढून विजय सोहळा, मंडळ व डेपोमधील कार्यकर्त्यांनी साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *