अशोक गायकवाड
कर्जत:परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील विश्वरत्न बाबासाहेब डॉ . भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारका शेजारच्या संविधान प्रतिमेची विटंबना व अवमान प्रकरणी संबंधित घटनेचे शांततापूर्ण निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना अमानुष बेदम मारहाण केली. या आंदोलनामध्ये सामील नसलेला कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी, भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला असल्याने सदर प्रकरणात सखोल कठोर व निपक्षपणे न्यायालयीन चौकशी करावी व याप्रकरणी मारहाण करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड या जातीयवादी आणि मनुवादी विचार सरणीच्या पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करावे, अशी संतप्त मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी केली.
सोमवार १६ डिसेंबरला कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत डी.डी टेळे , तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना या घटने संबंधी निवेदन देण्यात आले. झालेली घटना ठरवून केली असून केलेली मारहाण अतिशय निंदनीय होती. यामुळेच एका निष्पाप भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेची चौकशी होवून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांनी जाहीर निषेध करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी संतप्त मागणी आर पी आय (आ) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केली आहे. यावेळी कर्जत तालुक्यात संतप्त वातावरण असून निवेदन देतेप्रसंगी किशोर गायकवाड – संपर्कप्रमुख आरपीआय, अशोक गायकवाड सचिव, प्रेमनाथ जाधव – पत्रकार / पक्ष प्रवक्ता, विकास गायकवाड – खजिनदार, विजय गायकवाड – प्रसिद्धी प्रमुख, नितीन सोनवणे पंचायत समिती अध्यक्ष वेणगाव, अमर जाधव पंचायत समिती अध्यक्ष सावेळे, सतीश रिकेबे – तालुका संघटक, हरिश्चंद्र सदावर्ते – कार्याध्यक्ष नेरळ शहर, बाळा चंदनशिवे – अध्यक्ष नेरळ शहर, मयूर गायकवाड, रूपेश उर्फ बिनू रोकडे, उमेश भालेराव, महेंद्र भालेराव, अमित गायकवाड, ईश्वर भालेराव, कैलास पोटे सामाजिक कार्यकर्ता, जगदीश जाधव, अनिल जाधव, विश्वास भालेराव, त्याचप्रमाणे महिला कार्यकर्ते मंजुळा किशोर गायकवाड, अक्षदा अमित गायकवाड उपाध्यक्ष महिला आरपीआय, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, ज्योती भारत रोकडे, कांचन उमेश भालेराव, त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.