ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा  विज्ञान प्रकल्पाला  ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ मध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक  मिळाला असून या प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेली आहे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने ११ डिसेंबर  व १२  डिसेंबर दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ४४ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ज्ञानपीठ विद्यालयातील प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रयोग “आधुनिक दळणवळण अंतर्गत हायड्रोलिक व सोलार सिस्टम वर चालणारी रुग्णवाहिका” या प्रकल्पाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांका मिळाला आहे. या विज्ञान प्रदर्शनात  कु ओम काजरेकर, कु. श्रेयस खंडे,कु.आयुष वतने यांनी प्रकल्प सादर केला यासाठी शिक्षक दादासाहेब थोरवे व  सहकारी शिक्षक प्रशांत पिसाळ,राजेश शिंगाडे जयेश महाले प्रमिला साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळ्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष बाबासाहेब दगडे व संचालक मंडळाने सत्कार केला .तसेच  मुख्याध्यापक ( प्राथमिक + माध्यमिक ,उच्च माध्यमिक ) सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, जीवन संग्राम मंडळ, विद्यार्थी  व पालक या सर्वांच्या वतीने देखील अभिनंदन केला.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *