विशेष

राजेंद्र साळसकर

ह.भ.प. शामसुदर महराज सोन्नर यांचे आवाहन

संत आणि समाज सुधारकांनी वैचारिक मशागत केल्यामुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी चळवळी रुजल्या, महापुरुष घडले. देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले पण आज संत आणि महापुरुषांच्या विचारांत भेसळ करून तरुणांना जात्यांध, धर्मांध विचारात गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे, हे कारस्थान तरुणांनी वेळीच ओळखावे, असे आवाहन, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी मनमाड येथे झालेल्या कार्यक्रमात केले.
मनमाड येथील रेल्वे वर्कशॉप येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती उत्सवा निमित्ताने ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या ‘संविधान प्रबोधन पर्व’ अंतर्गत व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज या ठिकाणी तीन महान विभूतींची जयंती सर्व कामगार बंधू एकत्र येऊन साजरी करीत आहात, ही खूप आश्वासक बाब आहे. अलिकडे संत आणि महापुरुषांच्याही जात आणि धर्मावरून वाटण्या केलेल्या दिसतात. ज्या महामानवांनी समाजातील सर्व घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले त्यांना विशिष्ट एकाच विचारधारेच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्याही एका जात किंवा धर्मासाठी स्वराज्य निर्माण केले नाही, मात्र त्यांना एका विशिष्ट धर्माचे आयकाॅन म्हणून उभे करण्यात आले. एखाद्या जात आणि धर्माच्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी “जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. पण गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व समावेक कार्य लोकांसमोर मांडण्यात इथल्या विचारवंतांना यश मिळाले आहे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही एका जातीत अडकवण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्या आडून भारतीय संविधानालाही बदनाम केले जात आहे. गेल्या काही वर्षांत तर संविधानाला बदनाम करून बदलण्याची स्वप्ने विषमतावादी विचारांचे लोक पहात आहेत. मात्र आज या तिन्ही
महामानवांच्या साक्षीने सांगतो, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे मावळे, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी आणि भीम सैनिक सावध आहेत, तोपर्यंत कुणीही संविधानाला धक्का लावू शकणार नाही, असा आशावादही शामसुंदर महराज सोन्नर यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कारखाना प्रबंधक यादव साहेब, सिनियर सेक्सन इंजिनिअर आयुब शेख, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन इंगळे, सचिव पंढरीनाथ पठारे, खजिनदार सुमित आहिरे, कार्याध्यक्ष नितीन इमले, माजी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सचिव प्रवीण आहिरे, कार्याध्यक्ष किरण आहिरे, कारखाना शाखाचे खजिनदार संदिप धिवर, अतिरिक्त सचिव सागर गरूड, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखाचे सचिव नितीन पवार, एन. आर. एम. यु. कारखाना शाखा चे.रेल कामगार संघटनेचे मनसे रेल्वे कामगार संघटनेचे, ओ. बी. सी. असोसिएशन आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल सोनवणे, सिद्धार्थ जोगदंड, कल्याण धिवर राकेश ताठे, सुभाष जगताप, हर्षद सुर्यवंशी, विनोद खरे, शरद झोंबाड संतोष सावंत, किरण वाघ, गणेश वेन्नाल्लु, रमेश पगारे, विनोद झोडपे, संदिप पगारे, प्रभाकर निकम, राजेश जगताप, निखिल सोनवणे, विलास कराड, नदीम सैय्यद, नवनाथ जगताप, अनिल बोरसे विशाल घोडके, विजय गेडाम, विकास आहिरे, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुधीर अडकमोल, महिला आघाडीच्या संध्याताई सोनवणे, सिनियर सेक्सन इंजिनिअर झंकार चौधरी रेखाताई जाधव, विशाल त्रिभुवन मनिष कासवटे श्याम कापडणे, गौतम एळींजे राहुल शिंदे प्रेमदिप खडताळे सागर साळवे, प्रशांत मोरे दिपक राऊत प्रशांत निकम, अभ्युदय बागुल,दिपक अस्वले, प्रदीप आहिरे, गणेश केदारे, अनिल अहिरे, आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *