संविधानवादी वकील संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ठाणे : परभणी येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची जी तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर तेथे दंगल झाली. त्यात पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा ठाणे येथील संविधानवादी वकील संघटनेने निषेध व्यक्त करून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
संविधानवादी वकील संघटनेचे मुख्य समन्व्यक
ऍड. दिलीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघटनेतील वकिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत करावी आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.
ऍड. भानुदास अवचार, ऍड. एन. एस. वैद्य, ऍड.सावंत, ऍड. ब्रिजेश जयसवाल, ऍड. मिसेस जाधव इत्यादी वकीलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.