मुंबई : गिरनार  चहा  पुरस्कृत  आणि  मुंबई क्रिकेट  असोशिएशन  मान्यता प्राप्त  असलेली आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या ६ जानेवारी पासून शिवाजी पार्क येथे रंगणार आहे. यंदाचे या स्पर्धेचे ३१ वे वर्ष असून मुंबईतील  १६ नामांकित रुग्णालयीन क्रिकेट संघांचा  या स्पर्धेत समावेश आहे.  स्पर्धेचा उद्घाटन  सोहळा ६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बंगाल क्रिकेट क्लब  शिवाजी पार्क येथे होणार आहे.
मुंबई  क्रिकेट असोशिएशनचे  सरचिटणीस अभय हडप, खजिनदार, अरमान  मलिक  आणि भारताची  माजी महिला  क्रिकेटपटू प्रीती दिमरी  यांच्या  उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेत प्लेट आणि एलिट अश्या दोन गटामध्ये  प्रत्येकी ८ संघांचा सहभाग असेल. दोन्ही गटातील विजेत्या उपविजेत्या  संघाना  चषक देण्यात येतील. तसेच स्पर्धावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांना देखील विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. सहभागी होणाऱ्या  १६ संघाना गिरनार चहातर्फे  क्रिकेट  किट, टि शर्ट देण्यात  येणार आहेत.
स्पर्धा  यशस्वी  करण्याकरिता जाफरी भाई, अनिल बैकर, मिलींद  सावंत, प्रमोद  पाताडे, योगेश  जांभळे, श्रीकांत दुधवडकर, प्रदीप  क्षीरसागर हे अथक मेहनत घेत  आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *