अनिल ठाणेकर
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर हूरळून जाण्याची गरज नाही. त्याच ताकतीने आणि एकजुटीने पुन्हा आपल्याला कामाला लागायचे असून पक्षाचा एक नंबर कायम ठेवायचा आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे जरुरीच आहे असे मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्यता नोंदणी कार्यशाळेत उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ह्यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उत्तर रायगड जिल्हा सदस्य  नोंदणी कार्यशाळा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल येथे पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *