अशोक गायकवाड
रायगड : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
३२ रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी (दि.१५ एप्रिल रोजी ) पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे, अनंत गिते (अपक्ष -१अर्ज), अनंत बाळोजी गिते (अपक्ष -१अर्ज), अनंत गंगाराम गिते ( शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – १+ ३ अर्ज), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष -१), आस्वाद जयदास पाटील (अपक्ष -१) असे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांनी सांगितले.
पाचपैकी अनंत गिते या नावाने तीन उमेदवारी अर्ज दाखल !
रायगड लोकसभा मतदारसंघात, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पाच नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यापैकी अनंत गीते या नावाने तीन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. अनंत गीते या नावाने अपक्ष उमेदवाराने एक, अनंत बाळोजी गिते या नावाने अपक्ष उमेदवाराने दुसरा तर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गंगाराम गिते यांनी, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या वतीने (१+३) नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.