पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल मर्डरचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची रहस्यमयरित्या मर्डर करण्यात आली होती. ही मर्डर दुसरीतिसरी कुणी केली नसुन या मामाच्या पत्नीनेच म्हणजेच योगश टिळेकर यांच्या मामीनेच सुपारी देऊन मामाचा काटा काढल्याचे समोर आले आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सुसंस्कृत पुणे हादरून गेले आहे.

भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही आठवड्यांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घाटात फेकून देण्यात आला होता. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याचा लाखांची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढलाय. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ  यांची त्यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या केली आहे. मोहिनी वाघ  असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. 

सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. काही आठवड्यांपूर्वी सतीश वाघ यांचे अपहरण करून  खून करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती..त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलय.. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ…

सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आले आहे. यात मोहिनी वाघ, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि  अक्षय जवळकर यांचा समावेश आहे. यापैकी अक्षयला पाच लाखाची सुपारी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *