मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य. वि. भातखंडे पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित केली आहे. या सभेत रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता जयपूर – अत्रौली घराण्याच्या गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर तेजोवृष जोशी आणि संवादिनीवर सिध्देश बिचोलकर साथ करणार आहेत. संस्थेच्या वा. वा. गोरवले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिक श्रोत्यांनी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
