मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर संतोष कटारे यांनी अभिनेता सलमान खान यांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या रक्ताने चित्र काढून त्यांना भेट देणार देणाऱ्या कलावंताचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे गुरुवारी दुपारी त्यांनी हे चित्र काढले. या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रगीत, येशू ख्रिस्त, भगतसिंग अशी साठ चित्र रक्ताने काढली आहेत.
सरासरी एक तास एक चित्र काढण्यास त्यांना वेळ लागतो. गेल्या १५ वर्षापासून त्यांनी ही कला जोपासली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लंडन मधील एका संस्थेचा त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता असो किंव्हा महापुरुष तसेच राष्ट्रगीत देवांची नावे अशी ६० चित्र त्यांनी काढली आहेत.
मुंबई येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ब्लड आर्टिस्ट म्हणून सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. महापुरुषाच्या विचाराने झपाटलेल्या डॉ. संतोष कटारे यांनी आतापर्यंत काढलेल्या चित्रात अजित पवार, प्रकाश आंबेडकर आदी राजकीय मंडळींची चित्र काढली आहेत. गुरुनानक देवजी, स्वामी विवेकानंद, छत्रपती आंबेडकर, मदर टेरेसा, अण्णा भाऊ साठे अशा अनेक महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या स्वतःच्या रक्ताने काढल्या आहेत.
त्यांना लंडन येथील संस्थेने ब्लड आर्टिस्ट म्हणून सन्मानित केले आहे. तसेच दुबईमध्ये त्यांना या विषयावर डिलीट पदवी देण्यात आली, तर फ्रान्समधून पीएच.डी.ची डिग्री देण्यात आली. दिल्ली येथे नेल्सन मंडेला पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले असून, नाशिक येथेही शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आलेला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *