मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या दि. 23 एप्रिल 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार “महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम 2020” अन्वये शीख आनंद धार्मिक विवाह रितीरिवाजानुसार पार पाडल्यास त्याची नोंदणी ‘आनंद विवाह नोंदणी अधिनियम 1909’ नुसार करण्याची अंमलबजावणी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मान्यतेने सर्व आठही विभाग कार्यालय स्तरावर सुरु करण्यात आलेली आहे. याकरिता आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रांचा तपशील सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तरी नमुंमपा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शीख समाज बांधवांनी, या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००
Photo-9
वीर बाल दिवस निमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
शीखांचे गुरु गोविंदसिंगजी यांचे सुपूत्र जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांच्या लहान वयातील शहादतीचे स्मरण करीत 26 डिसेंबर या दिवशी संपूर्ण देशभरात वीर बाल दिवस म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शासन निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये या दोन्ही वीर बालकांचे प्रतिमापूजन करुन स्मरण करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, प्रशासकिय अधिकारी श्री. विलास मलुष्टे व रवी जाधव आणि इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
