मुंबई : महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ – फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे वर्ष २०२५ च्या कॅरम, बुद्धिबळ तसेच गायन, उत्स्फूर्त वत्कृत्व, कथाकथन, सांघिक नृत्य, एकपात्री व द्विपात्री नाट्याभिवाचन इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या सर्व स्पर्धा फेस्कॉम च्या सभासद सदस्यांकरिता भरविण्यात येत आहेत. सदर स्पर्धांमध्ये मुंबई व नवी मुंबई परिसरातील संघांचे सदस्य मोठ्या संख्येने भाग घेऊन त्यांच्यातील सुप्त कलागुण व उत्साह यांच्या आधारे या स्पर्धा यशस्वी करत असतात. यावर्षी निबंध व चित्रकला स्पर्धाही घेण्याचे आयोजिले आहे. स्पर्धेचे स्थळ, तारिख व वेळ लवकरच जाहीर करून सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद संघांना व्हाट्स ॲप द्वारे व लेखी कळविण्यात येईल असे फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई विभागातर्फे निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत भाग घेणेसाठी अर्ज 15 जानेवारी 2025 पर्यन्त करावा, सदर स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सुरेश पोटे व स्पर्धा समितीतर्फे करण्यात आले आहे. संपर्क अध्यक्ष सुरेश पोटे मोबा. 9322401965 यांच्याशी करावा.
०००००
