उल्हासनगर : सरत्या वर्षाच्या अगोदर मालमत्ता थकीत कर भरणा करा अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने थकबाकीदाराना दिली आहे. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांविरुध्द मालमत्ता कर विभागामार्फत कर वसुली मोहिम राबविली जात असुन त्याअंतर्गत वॉरंट नोटीस देणे, जप्ती अटकावणी करणे, नळ जोडणी खंडीत करणे तसेच ढोल ताशे वाजवून व ध्वनीक्षेपनाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज युनिट क्रमांक १ ते ४ मधील मोठ्या थकबाकीदारांना वेळोवळी वॉरंट आणि नोटीस देवून देखिल त्यांनी मालमत्ता कराचा भरणा केला नव्हता अशा थकबाकीदारांना ढोल वाजवून ध्वनीक्षेपनावर त्यांच्या थकीत देयकाची सविस्तर माहिती देवुन कर भरणा करणेसाठी सुचना देण्यात आल्या आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक विकास ढाकणे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक निलम कदम, उप कर निर्धारक व संकलक सचिन वानखेडे, मनोज गोकलानी, कर निरिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली. तरी शहरातील नागरिकांना कर विभागामार्फत जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या थकीत मालमत्ता कराचा भरणा लवकरात लवकर करा. तसेच यापुढे आपण थकीत मालमत्ता कराचा भरणा ३१ डिसेंबर २०२४ पुर्वी न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
