सिंधुदुर्ग: आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत शिल्लक सेनेच् विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करून तब्बल अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलंय. सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांनी काहीही काम केलं नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केला नसला तरी नारायण राणे यांनी मात्र प्रचार सुरू केला आहे.

विनायक राऊत याच डिपॉझिट मला जप्त करायचं आहे, ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊतने या भागात काम केलं नाही, काम न केल्यामुळे खासदारकीचा पन्नास टक्केहून अधिक निधी शिल्लक राहिल्याचा आरोप नारायण राणे यांनी केली.

रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून नारायण राणे आणि किरण सामंत यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असून किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही असं आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहेत. महायुतीचे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र काम करत आहोत. या ठिकाणाहून महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी
काम करत आहोत.

अमित शाहांची येत्या 24 एप्रिलला रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील या जागेवर भाजपचं विशेष लक्ष आहे. या ठिकाणाहून भाजपकडून नारायण राणे तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छूक आहेत. महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *