कल्याण : कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षीय लहान मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत केलेल्या हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली असून आरोपी विशाल गवळी याला फाशी द्या अशी मागणी करत गेलं काही दिवसापासून राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. अशाच प्रकारे कल्याण पूर्व येथील शिवाजीनगर परिसरातील श्री शनिश्वर मित्र मंडळ आणि अष्टविनायक सेवा मंडळ यांच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांकडून या घटनेचा निषेध करत परिसरातील रस्त्यावर चौकात विशाल गवळीचा पुतळा बनवत त्याला प्रतीकात्मक फाशी देत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधरामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे” अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.