ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांना मिळणाऱ्या विविध लाभ याबाबत विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे.
शिक्षण प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक १६, पदवीधर शिक्षक ४८ व प्राथमिक शिक्षक ३६२ अशा एकूण ४२६ शिक्षकांना एका पदावर १२ वर्ष सेवा पूर्ण झाल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभ याबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
