चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात प्रवाशी सुखरूप.
माथेरान : सगळीकडे थर्टीफस्टची धामधूम सुरू असताना नेरळ माथेरान घाटात पर्यटकाच्या वाहनाला भीषण अपघात घडला.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावरून आदळून खालच्या रस्त्यावर येवून आपटली.यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कार रस्त्यातच मध्ये असल्याने येणाऱ्या वाहनांना काही काळ अडथळा निर्माण झाला होता.
पुणे नंबर पासिंग असलेली एम एच 12 बी बी 3333 क्रमांकाची ईनोवा कार मधील पर्यटक हे माथेरान फिरून परतीच्या प्रवासाला नेरळ दिशेने निघाले होते.कारचालक माथेरान घाट उतरत असताना कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रक रस्त्याच्या 134 या क्रमांकावर वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून सुरक्षा कठडा असणारा कठडा चढून खालच्या वळणा वरील रस्त्यात आदळली.यामध्ये कारचे नुकसान झाले होते,परतू कार मधील पर्यटक सुखरूप होते.दैवबलवत्तर म्हणून यावेळी समोरून कुठलेही वाहन आले नव्हते तर खोल दरी देखील बाजूला नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.दरम्यान वाहनातील पर्यटक घाबरून दुसऱ्या वाहनात बसून कार तिथेच सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान पर्यटकांच्या बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नसून या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात देखील कुठली तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.
एकूणच थर्टीफर्स्टची धामधूम सुरू असताना माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.