अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा
मुंबई:- दिल्ली येथे ३ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता स्नेहल साळुंखे या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. या महिला संघात तिच्या सोबत पहिली जागतिक महिला कबड्डी स्पर्धेत खेलेली सुवर्णा बारटक्के, तसेच नुकताच शिवछत्रपती पुरस्कार मिळविलेल्या सायली जाधव चा ही समावेश आहे. पुरुष संघाचे नेतृत्व सलग ६ वर्ष महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या अंकुश महाले याच्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या संघात निलेश चिंदरकर हा अनुभवी खेळाडू आहे. चार दिवसाच्या सरावानंतर हा संघ १जाने. रोजी रात्रौ स्पर्धेकरीता दिल्लीला रवाना झाला. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
महिला संघ:- १)स्नेहल साळुंखे – संघनायिका(शिवछत्रपती पुरस्कार), २)सुवर्णा बारटक्के(शिवछत्रपती पुरस्कार), ३)सायली जाधव(शिवछत्रपती पुरस्कार), ४)प्रियांका तावडे, ५)कल्पिता शिंदे, ६)मनीषा जगताप, ७)मनीषा मानकर, ८)स्वाती काकडे, ९)अलका निमसे, १०)वैशाली खरमाळे, ११)माधवी राऊळ, १२)सारिका क्षीरसागर, १३)जयश्री साठे, १४)ज्योती राक्षे.
प्रशिक्षक:- संतोष जाधव. व्यवस्थापक :- गणेश भोईर.
पुरुष संघ:-१)अंकुश महाले – संघनायक, २)निलेश चिंदरकर, ३)मारोती पवार, ४)शुभम मोठे, ५)अजिंक्य महाले, ६)विक्रम कदम, ७)सूरज कांबळे, ८)बालाजी क्षीरसागर, ९)शुभम सुर्वे, १०)कुणाल शिंदे, ११)विशाल कोटमे, १२)नागराज जाधव, १३)नितीन मोरे.
प्रशिक्षक:- आनंदा हेगडे. व्यवस्थापक:- जयवंत शेट्ये.
00000
