सिध्देश शिगवण
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘शिवसेना वैद्यकीय मदत’ कक्षाच्या वतीने हे संपूर्ण वर्षे ‘एकनाथ हिरक आरोग्यवर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. परंपरेनुसा ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून नववर्षाचे स्वागत केले. या रक्तदान शिबिराने या ‘एकनाथ हिरक आरोग्यवर्ष’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत पुढील उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. :
६०० लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया (ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे)
६०० दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप (आनंद आश्रम, ठाणे)
राज्यात ६० भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन (संपूर्ण महाराष्ट्र)
६० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी (संपूर्ण महाराष्ट्र)
६० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप (संपूर्ण महाराष्ट्र)
६० हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (संपूर्ण महाराष्ट्र)
६० हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा (संपूर्ण महाराष्ट्र)
६० हजार वृक्ष लागवड (आंबा, चिंच, वड, पिंपळ, लिंब इ)-(संपूर्ण महाराष्ट्र)
