राजीव चंदने
मुरबाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यंच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अण्णा साळवे यांनी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहीका देऊन, त्या जनसेवा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. यावेळी आमदार कथोरे म्हणाले कि,मी अण्णाच्या मागे नाही तर अण्णा कायम सोबत आणि बरोबर आहे. या रुग्ण वाहिकेचा सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी उपयोग झाला पहिजे असे बोलून अण्णा साळवे यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष मुकेश विशे, सरचिटणीस नितीन मोहपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे, मोहन सासे,कांतीलाल कंटे,रवींद्र चंदने,रिपई प्रदेश उपाध्यक्ष महबूब पैठणकर, मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,दीपक पवार, ऍड सचिन चौधरी, गुरुनाथ पवार, सुवर्णा देसले,दीपक खाटेघरे,कैलास देसले,शिवराम पवार, प्रकाश जाधव,नरेश देसले,नरेश मोरे, धनंजय थोरात, रवींद्र गायकवाड,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या शुभ प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समता सामाजिक फाऊंडेशनचे शंकर करडे, संजय बोरगे, लक्ष्मण पवार, दिलीप पवार, सुभाष जाधव यांच्या वतीने पेढे व पेन चे वाटप करण्यात आले.