मुंबई : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे कुस्तीच्या सरावा करिता येणाऱ्या , मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंनी पालघर येथे झालेल्या ४९ व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत सहा सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकुण दहा पदके पटकावुन चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत या कुस्तीपटूंनी आपल्या संघाला सांघिक विजेतेपद देखील मिळवुन दिले. त्यांच्या सचिन म्हस्के, अर्जुन शेडगे, रावसो रजगे, आनंद गद्दे, हेमचंद्र संदुर, निलेश शिंदे यांनी सुवर्णपदकावर कब्जा केला. तर मुकेश बिरारी, जमीर मुलानी यांना रौप्य आणि मंगेश मोहिते, प्रवीण थोबरे यांना कांस्य पदके मिळाली. पदक प्राप्त सर्व पैलवानांचे श्री गणेश आखाड्यातर्फे खास अभिनंदन करण्यात आले असुन पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
0000