ठाणे : मुली सर्वाच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, प्रसंगी दगडगोटे खाऊन मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने झटत राहिल्या त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिन म्हणून राहनाळ शाळेमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. असे उद्गार ग्रामपंचायतचे सदस्य उमेश पाटील यांनी काढले.
बालिका दिन म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राहनाळ शाळेमध्ये मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषा केल्या होत्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नेहा झुंजारराव या विद्यार्थिनींच्या अध्यक्षतेखाली बालसभा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी घारगे हिने केले. यावेळी शौर्य मत्रे, श्रावणी मत्रे, हर्षदा जाधव, वैष्णवी, रुही चिकणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगितली. तर इयत्ता तिसरीच्या आणि दुसरीच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव करणाऱ्या ओव्या सादर केल्या. शिक्षक अजय पाटील, अंकुश ठाकरे, संध्या जगताप यांनी मुलांना सावित्रीबाईंच्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. याचवेळी अजय पाटील लिखित “आम्ही फुले बोलतोय” हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.शिक्षण देणे आणि घेणं हे आज काळाची गरज आहे, शिक्षणानेच माणूस स्वतःची प्रगती करू शकतो असा संदेश अजय पाटील यांनी मुलांना दिला.आभार प्रदर्शन अर्णव खोपडे या विद्यार्थ्यांने केले.
00000