डोंबिवली – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात ते उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत उपस्थित झाले असता गावात त्यांचे जंगी स्वागत झाले.
यावेळी राऊत व दरेकर यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का ? त्या त्यांच्या सारथी झाल्या आहेत का? अशी एकच चर्चा आता रंगू लागली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी आले होते. तत्पूर्वी नेवाळी नाका येथे उमेदवार वैशाली दरेकर, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण शहर प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी यांच्या वतीने राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील गोरपे गावात देखील जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी राऊत यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या महायुतीतील कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले.
याआधी देखील कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता चक्क दरेकर यांच्या प्रचारातच सुलभा गायकवाड त्यांच्या सोबत दिसल्याने गायकवाड यांनी दरेकर यांच्या सारथी झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे महायुती उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उबाठा च्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान नेवाळी नाका येथे नेते संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी संवाद साधला…
राऊत यांनी दोनच दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. उपचाराचा खर्च आम्ही देणार असा खासदार शिंदे यांनी पलटवार केला होता. त्यांच्या या टिकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
