ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.