मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वाचनालयाची वास्तू केईएम रुग्णालय प्रशासन शतक महोत्सवी वर्षाच्या नुतनीकरणाचे कारण सांगत, अचानकपणे वाचनालयाची वास्तू हटविण्यासाठी सांगण्यात आले. वाचनालयाचे सर्व साहित्य तात्पुरत्या स्वरूपात जिमखान्यात ठेवाव्यात, एवढाच तोंडी संदेश देत कोणत्याही प्रकारची व्यवस्था आणि भक्कम अशी पर्याय उपलब्ध करून न देता वाचनालय हटविण्यासाठी प्रशासनाने टोकाची भूमिका घेतली. या संदर्भात केईएम रुग्णालयातील सर्व कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने चुकीच्या पद्धतीने वाचनालय हटविण्यास ठाम विरोध केला आहे. केईएम कामगार संघटनेच्या जयंती उत्सव कमिटीचे साहित्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजशाहू महाराज, यांच्या सह इतर महापुरुषांच्या तसबिरी, मुर्त्या ठेवल्या आहेत त्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. म्हणूनच वाचनालय हटविण्यास ठाम विरोध दर्शविला आहे, वाचनालयाचे नुतनीकरण करून सुशोभित करावे असा आग्रह कामगारांनी धरला आहे पण प्रशासन काही ऐकण्यास तयार नाही . कामगारांच्या भावनांचा आदर करीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईचे सरचिटणीस सन्माननीय वामन कविस्कर, प्रफुलता दळवी, अनिल निरभवने, रामगोपाल डागोर, प्रफुल्ल अहिरे, शंकर खरात,विनोद जाधव, म्युनिसिपल कामगार सेनेच्या सरचिटणीस रचना अग्रवाल, उपाध्यक्ष संजय कोईलकर, केईएम अध्यक्ष देवा सावंत , पि.एल. सिंग मनसे कामगार सेनेचे लहू घोगळे, महेंद्र परब, दि म्युनिसिपल मजदुर युनियन ७० चे केईएम अध्यक्ष संजय सरोहा इतर सर्व संघटनेच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता यांच्या भेटीसाठी आले होते. अधिष्ठाता मॅडम प्रशासकीय कमासाठी मंत्रालयात गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. वैद्यकीय अधीक्षक आणि उप. अधिष्ठाता यांची भेट घेऊन वाचनालयाची वास्तू हटविण्यात येऊ नये असे ठामपणे कविस्कर यांनी ठासून सांगून युनियनच्या वतीने पत्रही देण्यात आले आहे ! सर्व कामगार संघटनेचे प्रतिनिधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *