मुंबई : भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व सहसचिव डॉ चंद्रजीत जाधव आज मुंबईत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे निमंत्रण देण्यासाठी मंत्रालयात आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले व सहसचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर, डलेश देसाई, सचिन पालकर व स्वप्निल पोळ होते.
हि स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष व महिलांचे २३ देशांचे ३९ संघ सहभागी झाले असल्याचे मित्तल यांनी पवार यांना स्पष्ट केले. पुरुष गटात २० तर महिला गटात १९ संघ सहभागी झाले आहेत. भारत वि नेपाळ या पुरुषांच्या सामन्याने खो-खो विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. तर महिला सलामीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक सुध्दा जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.