रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महायुतीला पाठिंबा दिला की, त्यांना तो द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी मनसेला टोले लगावेलत.
“मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, तुम्ही मुळचे शिवसैनिक आहात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे तुम्ही शिवसैनिक आहात. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला, तो निर्णय त्यांना घेऊद्या. परंतु मी मनसैनिकांना जाहीरपणे आवाहन करतो की, आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे रहा आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा”, असे भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपरकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भास्कर जाधव आम्हाला तुमची दया येते. राज ठाकरे यांची टाळी कधी पाहिली आहे का? आम्हाला आता उद्धव ठाकरे यांची कीव येते आणि कोत्या मनोवृत्तीची चीड येत आहे’, असे अमेय खोपरकर म्हणाले आहेत.