अशोक गायकवाड
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन वी.डी.आय.पी.एल. चे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. वैभव देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे कौतुक केले आणि मी स्वतः महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगितले.*
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.स्वस्तिका संदीप घोष हिने टेबल टेनिस खेळामध्ये इंडिया रॅक-१ हे स्थान प्राप्त केल्याबद्दल तिचे कौतुक केले. त्याचबरोबर जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात खेळा विषयीचे महत्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना खेळामध्ये जास्तीत जास्त प्राविण्य प्राप्त करा असे आवाहन केले. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती व प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *