मुंबई : अमरावतीत नवनित राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणांच्या विरोधात प्रहारच्या बच्चू कडूंनी उमेदवार उभे केला आहे. प्रहारच्या या उमेदवाराला आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे.

भाजपने येथे स्वपक्षिय आणि मित्रपक्षांचा विरोध डावलून विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. अमरावतीच्या जागेवर बच्चू कडूंनी ठाकरे गटाते नेते दिनेश बुब यांना प्रहारकडून उमेदवारी देत खासदार नवनीत राणांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता शेतकरी नेते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने अमरावतीचे प्रहारचे उमेदवार  दिनेश बुब यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावतीत प्रहारची ताकद वाढणार असून नवनीत राणांच्या विरोधात आता राजू शेट्टींनीही  दंड थोपटले असल्याचे बोलले जात आहे.

नवनीत राणांचे डिपॉझिट जप्त करू – बच्चू कडू

राणांचा आपण  दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य करत बच्चू कडूंनी ही निवडणूक जरा जास्तच गांभीर्याने घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नवनीत राणांसाठी भाजपनेही आपली कंबर कसली असून राणांच्या प्रचारार्थ आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तीमुळे मतदार आता नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *