सोयगाव: मुलांच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने ही जगाचा निरोप घेतला ही घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे घडली. तिडका येथील पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने शनिवार सायंकाळी सहा वाजता निधन झाले. काही वेळाने आई निर्मलाबाई नामदेव गवळी( वय ७०) यांची प्रकृती बिघडली. त्यांना नातेवाईकांनी गोदेंगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार झाल्यानंतर काही वेळाने तिडका येथे घरी आणले असता रविवार पहाटे तीन वाजता त्यांचे देखील निधन झाले..
तिडका येथील स्मशानभूमीत पांडुरंग गवळी यांच्यावर शनिवारी रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने देखील जगाचा निरोप घेतल्याची घटना घडल्याने तिडका गावात शोककळा पसरली होती.
०००००

