कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.