महायुतीची तीसवर दमछाक
माविआची १८ जागांवर घोडदौड
मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय पडजडीनंतर आता निवडणूकीआधीच्या शेवटच्या मतदानपुर्व चाचणीत जबरदस्त उलथापालथ होणार आहे. भाजपाप्रणीत महायुतीला ११ जांगाचा फटका बसणार असून महायुतीची १८ जागांवर विजयी घोडदौड असेल. असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरने केलेल्या मतदानपूर्व चाचणीत वर्तवण्यात आल आहे.
शिवसेनेत फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंचा आणि राष्ट्रवादी फोडणाऱ्या अजित पवारांचा भाजपाला फायदा होण्याएवेजी नुकसानच जास्त झाल्याचे हा सर्व्हे सांगतोय. भाजपाच्या २०१९ साली जिंकलेल्या २३ जागांपैकी तीन जागा कमी होतील तर एकनाथ शिंदेना फक्त ९ जागापर्यंत पोहचता येईल. अजित पवार भोपळाही फोडू शकणार नाही असा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या २०१९ च्या निवडणूकीत भाजपा आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. आता उद्धव ठाकरेंच्या जाण्याने हा आकडा ३० पर्यंत पोहचत आहे. दुसरीकडे उध्दव ठाकरेंच्या सहभागामुळे महायुतीला मात्र फायदा झाल्याचे चित्र आहे. गेल्यावेळी एक जागा जिंकणाऱी काँग्रेस तीन जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर अजित पवार वेगळे होऊनही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या २०१९ च्या चार जागांच्या तुलनेत यंदा एक जागा जास्त जिंकण्याचा अंदाज आहे. अजित पवार भोपळा फोडत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी ५ जागा जिंकत असल्यामुळे असली नकलीचा फैसला या निवडणूकीत झाल्यात जमा आहे. हा निकाल असाच लागला तर अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव घेऊनसुध्दा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागा जिंकल्यास आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ठाकरे सेनेचे मनोबल उंचावलेले असेल.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती लोकसभेची निवडणुकीत एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. याठिकाणी सुनेत्रा पवार पिछाडीवर दिसत आहेत. बारामती लोकसभेसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला 30 जागांवर विजय मिळेल. यामध्ये भाजपला 21 ते 22, शिंदे गटाला 9 ते 10 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकाही जागेवर विजय मिळणार नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये काँग्रेसला 3, शरद पवार गटाला 5 आणि उद्धव ठाकरे गटाला एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला गडचिरोली-चिमूर, नंदुरबार आणि नांदेडमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाला बारामती, सातारा आणि शिरुर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये विजय मिळेल, असा अंदाज आहे.
मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी आग्रहाने मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघ मागून घेतले होते. केवळ दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले होते. मात्र, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार मुंबईतील सर्व जागांवर महायुती अर्थात एनडीएच्या उमेदवारांचा विजयी होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. केवळ ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपच्या मिहीर कोटेचा यांना तगडी लढत देऊ शकतात. त्यामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा विजय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज आणि शिंदे गटाकडून संजय मंडलिक रिंगणात आहेत. ही जागा प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र, एबीपी माझाच्या ओपनियन पोलनुसार कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. याठिकाणी तगडी लढत होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये महायुतीचे संजय मंडलिक विजय होऊ शकतात, असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे.